चिक्कोडी (वार्ताहर): शितोळे अंकली (ता. चिक्कोडी) येथील श्रीमंत सरदार आणि शितोळे संस्थानिक घराण्याच्या राजमाता महाराजकुमारी विजयाराजे प्रतापसिंहराजे शितोळे अंकलीकर यांचे आज वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
त्या श्रीमंत ऊर्जितसिंह राजे शितोळे त्यांच्या मातोश्री व श्रीमंत युवराज महादजीराजे शितोळे यांच्या आजी तर कोल्हापूर येथील श्रीमंत छत्रपती शहाजी राजे भोसले यांच्या कन्या होत. उद्या शनिवार दि. 8 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.00 वा. शितोळे अंकली येथील (वृंदावन) कृष्णा काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.