मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह देण्यात आले आहे.काल ठाकरे गटाला मशाल चिन्ह देण्यात आल्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गटाला नवे तीन पर्याय देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन पर्याय देण्यात आले होते. त्यातून त्यांना ढाल-तलवार चिन्ह देण्यात आले आहे.
निडणूक आयोगाने काल दोन्ही गटांना पक्षाची नावे दिली. यात ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' हे नाव देण्यात आले आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव दिले होते. शिवाय ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह दिले होते. तर शिंदे गटाला दुसऱ्या तीन चिन्हांचा पर्याय देण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर शिंदे गटाकडून आज ढाल-तलवार, उगवता सूर्य आणि पिंपळाचं झाड अशी तीन चिन्हे देण्यात आली होती. त्यातील ढाल-तलवार हे चिन्ह निवडणूक आयोगाने शिंदे गटाला दिले आहे.