गडहिंग्लज (प्रतिनिधी): भडगाव येथील कै. बापूसो आप्पासो कित्तूरकर सार्वजनिक मोफत वाचनालयात भारताचेेेे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांचा जन्मदिन "वाचन प्रेरणा दिन" म्हणून साजरा करण्यात आला.
प्रारंभी मारुती कुरबेट्टी यांच्या हस्ते डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी वृत्तपत्र विक्रेते शंकर गडकरी यांना पुष्प व ग्रंथ भेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या ग्रंथ प्रदर्शनास विद्यार्थी व ग्रामस्थांनी भेट दिली.
यावेळी वाचनालयाचे संचालक वसंत नाईक, आप्पासाहेब कापसे, माजी सैनिक भरत येळुरे, पापा हुदली, मल्लिकार्जुन चौगुले, डॉ.प्रकाश राठोड, आशा सेविका सुरेखा चौगुले, गीता भकरी, रेश्मा कुंभार, माधुरी पुजारी उपस्थित होते. कार्यक्रमास उपस्थितांचे आभार ग्रंथपाल महादेवी भकरी यांनी मानले.