गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात मायक्रोबायोलॉजी व फूड सायन्स विभागामार्फत उद्या दिनांक 19 ऑक्टोबर रोजी फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे.
या फेस्टिव्हलमध्ये विविध प्रकारच्या पौष्टिक पदार्थांचे प्रदर्शन, अन्न भेसळ, ग्राहकांचे अधिकार व जागरूकता त्याचबरोबर फूड सायन्स व मायक्रोबायोलॉजीच्या विविध उपकरणांची प्रात्यक्षिके त्याबद्दलची सविस्तर माहिती देणारे स्टॉल मांडण्यात येणार आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत हे फेस्टिव्हल सुरू होणार आहे. या फेस्टिव्हलचा लाभ सर्वानी घ्यावा असे आवाहन शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिलराव कुराडे व प्राचार्य डॉ. एस.एम.कदम यांनी केले आहे.