नवज्योत तरुण मंडळाच्या वतीने दसरा महोत्सव उत्साहात साजरा
"होम मिनिस्टर" स्पर्धेत सुनिता जाधव ठरल्या 'पैठणी'च्या मानकरी
![]() |
(छायाचित्र : मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील नवज्योत तरुण मंडळाच्या वतीने दसरा महोत्सव घेण्यात आला. या महोत्सवाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध स्पर्धा व कार्यक्रमांमध्ये महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
यावेळी महिलांसाठी विविध खेळ, सामाजिक उपदेशपर व्याख्याने, हळदीकुंकू, दांडिया स्पर्धा, संगीत खुर्ची, होम मिनिस्टर स्पर्धा संपन्न झाल्या.
प्रारंभी सर्व मान्यवरांचे व उपस्थितांचे स्वागत मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष मांगले यांनी केले. यावेळी ते म्हणाले, गेली दोन वर्षे कोरोना काळात सर्व कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते.
होम मिनिस्टर स्पर्धेत प्रथम क्रमांकाच्या पैठणी साडीच्या मानकरी सुनिता धनाजी जाधव, प्रेशर कुकरच्या द्वितीय क्रमांकाच्या मानकरी सुजाता राजाराम वाघ, तृतीय क्रमांकाच्या टिफिन बॉक्सच्या मानकरी अंकिता वैभव गवळी ठरल्या. या स्पर्धेत 30 महिलांनी सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस वितरण गीता पाटील, कमल देवार्डे, फराकटे मॅडम, सोनाबाई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी आकाश देसाई, प्रेम इंगळे, दिनेश किल्लेदार, महांतेश हडपद, शिवाजी गवळी, सचिन देवेकर यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास उपस्थित सर्वांचे आभार अध्यक्ष पवन बुगडे यांनी मानले.