हत्तरगी (वार्ताहर): मौजे धोंडगट्टे (ता , हुक्केरी) येथे दिपावली निमित्त श्री.भैरवनाथ देवाची व श्री.रेणुका देवीची (यल्लमादेवी ) यात्रा बुधवार दिनांक 26 ऑक्टोबर रोजी संपन्न होत आहे.
यात्रेचे नियोजन करण्यासाठी रविवारी भैरवनाथ देवस्थान येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीला धोंडगट्टे , कोट, बेळंकी व महाराष्ट्रातील गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ, सावतवडी, लिंगनुर, जांभूळवाडी, तेगीनहाळ , मुंगुरवाडी, दुगुणवाडी या गावचे प्रतिनिधी उपस्थित होते.