संत गजानन फार्मसीत व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा संपन्न
![]() |
महागाव : येथील संत गजानन महाराज फार्मसी महाविद्यालयात आयोजित एकदिवशीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. मंगल मोरबाळे. |
गडहिंग्लज( प्रतिनिधी):विद्यार्थ्यांचे उज्ज्वल करिअर घडविण्यासाठी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकास होणे आवश्यक आहे. तुमचे व्यक्तिमत्त्व हे तुम्ही कसे आहात याचा आरसाच आहे. तुम्ही कसे दिसता या पेक्षा कसे वागता हे महत्त्वाचे असून प्रभावी व्यक्तिमत्त्व निर्माण करण्यासाठी आरामदायी जीवन शैलीतून बाहेर पडण्याचा सल्ला प्राचार्य डॉ. मंगल मोरबाळे यांनी महागाव (ता. गडहिंग्लज )येथील संत गजानन महाराज रुरल फार्मसीत आयोजित एक दिवसीय व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत विद्यार्थ्यांना दिला.
डॉ.मोरबाळे पुढे म्हणाल्या, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी भावनिक, बौद्धिक, शारीरिक, सामाजिक, आणि आध्यात्मिक अशा पाच अंगाचा समतोल विकास होणे आवश्यक असून ते प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी विद्यार्थीदशेतच प्रयत्न व्हायला हवे असल्याचे मत व्यक्त केले.दुसऱ्या सत्रातील मार्गदर्शनात डॉ. प्रतिभा चव्हाण यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार मूल्य व नेतृत्वगुणाचा विकास व्हावा हाच या कार्यशाळेचा उद्देश असून शैक्षणिक गुणवत्ता बरोबरच प्रभावी व्यक्तिमत्त्व असणे ही काळाची गरज बनल्याचे सांगितले. स्वागत प्राचार्य डॉ.अन्सार पटेल यांनी केले. मान्यवरांच्या हस्ते कार्यशाळेचे शुभारंभ प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने झाले. या कार्यशाळेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रा.अजिंक्य चव्हाण यांनी आभार मानले.