Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्याकडून विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र

🔘डॉ.जे.पी.नाईक शैक्षणिक व्यासपीठातर्फे आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण

🔘विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

🔘शैक्षणिक क्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त शिक्षकांचाही सत्कार

गडहिंग्लज : पुनम बाळेश नाईक हिने ए.डी.शिंदे अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.ई.सिव्हिल पदवी प्रथम क्रमांकाने मिळविल्याबद्दल  उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते सत्कार स्वीकारताना पुनमचे वडील बाळेश नाईक व आई शिक्षिका सौ.सुवर्णा नाईक.
                                 (छाया: महादेव मोरे)

गडहिंग्लज(प्रतिनिधी):
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे मात्र त्यांच्यामध्ये असणाऱ्या न्यूनगंडामुळे ते व्यक्त होऊ शकत नाहीत. विद्यार्थ्यांनी मनात भीती न बाळगता यशस्वी होण्यासाठी आपले आचार, विचार बदलावेत व आपला व्यक्तिमत्व विकास घडवून आणावा असे आवाहन करत उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र दिला.

 गडहिंग्लज येथे डॉ. राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेत पद्मभूषण डॉ.जे.पी.नाईक शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने देण्यात येणाऱ्या "आदर्श शिक्षक पुरस्कार" वितरण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक होते.

गडहिंग्लज: कार्यक्रमाचे दीपप्रज्वलनाने प्रारंभ करताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे. यावेळी उपस्थित पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक यांच्यासह इतर मान्यवर. (छाया: महादेव मोरे)

यावेळी व्यासपीठावर शिक्षण विस्तार अधिकारी रमेश कोरवी, डॉ. राधाकृष्णन प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रकाश कुंभार, व्हाईस चेअरमन जनार्दन पाटील, संचालक संजय चाळक, सतीश तेली, मारुती घोलराखे, सिकंदर कांबळे, श्रीमती रूपाली गुरव, अलका सूर्यवंशी उपस्थित होते.

प्रारंभी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, पंचायत समितीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक यांच्या हस्ते डॉ. जे. पी. नाईक व डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी सतीश तेली यांचा सत्कार बाळेश नाईक तर संजय चाळक यांचा सत्कार उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले. यावेळी मानपत्राचे वाचन श्रीधर पाटील यांनी केले.

यावेळी डॉ. जे.पी.नाईक शैक्षणिक व्यासपीठातर्फे बाळकृष्ण कदम, सुमन दरेकर, दिगंबर जाधव,जयश्री भूसुरी,अशोक गडदराम या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आला. 

तसेच यावेळी विविध शैक्षणिक क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त शिक्षक आनंदराव कुंभार, प्रकाश देशपांडे, महेश घुगरे, तानाजी पुंडपळ, दिनकर खवरे, नम्रता पोवार, गणेश कांबळे, निलेश गावडे, शिवगोंडा खापरे, सचिन गवळी आदी शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. तसेच  शैक्षणिक व्यासपीठाला देणगी दिल्याबद्दल राजेंद्र कोरवी, दिगंबर जाधव यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला

यावेळी बोलताना उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे पुढे म्हणाले, विद्यार्थी हे देशाचे भवितव्य आहेत त्यामुळे आपण नेहमी विद्यार्थ्यांच्या विविध समस्या व अडचणी सोडविण्यावर प्रथम प्राधान्य देतो. शैक्षणिक दाखल्याअभावी त्यांचे कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांची अडवणूक होऊ नये यासाठी आपला सदैव प्रयत्न असतो. विद्यार्थ्यांसाठी आपल्या कार्यालयाची दारे सदैव उघडी आहेत असे सांगितले. विद्यार्थ्यांना यशाचा कानमंत्र देताना श्री.वाघमोडे  म्हणाले, विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या अंगी वक्तशीरपणा बाळगला पाहिजे. ही गोष्ट जर आपल्याला शक्य झाली तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही. विद्यार्थ्यांनी वेळेला अधिक महत्त्व दिले पाहिजे. वेळेचे काटेकोर पालन त्यांनी केले पाहिजे तरच आपण हे जग जिंकू शकतो. आपले आचार, विचार यामध्ये बदल करून स्वतःचा व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांनी केला पाहिजे. जोपर्यंत विद्यार्थ्यांना आपला आत्मसाक्षात्कार होत नाही तोपर्यंत यश शक्य नाही. विद्यार्थ्यांनी सर्व गोष्टी वेळेवर केल्या पाहिजेत, समाजात आपण एक स्वतःची ओळख निर्माण करून आदर्श नागरिक बनले पाहिजे असे सांगत आपण कितीही उंचीवर गेलो तरी आपले आई-वडील, शिक्षक, आपली नाती जपावीत असे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी नेहमी आपल्या आवडीचे क्षेत्रच निवडावे स्पर्धा परीक्षेची तयारी करताना केवळ पुस्तकी ज्ञान असून चालणार नाही तर आपला व्यक्तिमत्व विकास विद्यार्थ्यांनी घडवावा. परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता त्यांनी आपल्यामध्ये तयार करावी तरच यामध्ये यश मिळू शकेल.


सुसंस्कृतांकडून वृद्ध आई-वडिलांची अवहेलना ही चिंतनीय बाब !

आपण दुसरे प्राधान्य ज्येष्ठ नागरिकांना देतो असे सांगून उपविभागीय अधिकारी श्री. वाघमोडे पुढे म्हणाले, सध्या सुशिक्षित लोकांकडूनच वृद्ध आई-वडिलांची अवहेलना होत असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. हे फारच दुर्दैवी म्हणावे लागेल असे सांगत त्यांनी याबाबत चिंता व्यक्त केली. ते म्हणाले आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणाऱ्या आई-वडिलांची वृद्धापकाळी मुलांकडूनच होणारी परवड ही फारच अशोभनीय आहे. शहरी भागात असणारे हे लोण सध्या ग्रामीण भागात देखील दिसत आहे. आपण वृद्धांच्या अशा समस्यांकडे गांभीर्याने लक्ष घालत असल्याचे सांगितले. अशा तक्रारींची तातडीने दाखल घेत ज्येष्ठ नागरिकांना न्याय मिळवून देत असल्याचे सांगितले. ज्येष्ठ नागरिकांनी अशा तक्रारी असतील तर नक्कीच आपल्याकडे मांडाव्यात, वेळीच न्याय मिळवून देण्यात येईल असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. 

शिक्षकांच्या चांगल्या कामाची समाजाने दखल घ्यावी : बाळेश नाईक

यावेळी बोलताना पंचायत समितीचे माजी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक म्हणाले, शिक्षक हा विद्यार्थी घडवण्याबरोबरच समाजातील विविध घटकांची कामे निस्वार्थीपणे अहोरात्र करत असतो. त्यांच्या चांगल्या कार्याची दखल समाजाने घेतली पाहिजे. आज आदर्श शिक्षक पुरस्काराच्या रूपाने शिक्षकांचा झालेला गौरव हा त्यांच्या चांगल्या कामाची  दिलेली पोचपावती म्हणावी लागेल. उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे हे एक कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यातील समाजसेवेची तळमळ ही कौतुकास्पद आहे. सर्वसामान्यांची कामे वेळेत व विनाअडवणूक व्हावेत यासाठी त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. असे अधिकारी हे दुर्मिळच असतात असे सांगून उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांच्या कार्यपद्धतीचे श्री.नाईक  यांनी कौतुक केले.यावेळी महेश घुगरे, प्रकाश देशपांडे, सतीश चाळक यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केलेल्या राजवर्धन मारुती कोलूनकर, नवोदय विद्यालयात निवड झाल्याबद्दल अनुष्का अण्णासाहेब कानडे, राज्यस्तरीय धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शर्व महेश  घुगरे, इयत्ता दहावी परीक्षेत यश मिळवलेल्या वैभवी प्रवीण तौकरी, स्वरांजली बाळासो जाधव, प्रणव रवींद्र पाटील, मोहम्मद इलियास मलिकसो करीमगोळ, वेदांत राजाराम नाईक, तनिष्का तानाजी शिंदे, संतोष प्रकाश बेटगार, आयुष्या नामदेव पाटील,


 तेजस महादेव पाटील, सलोनी सुरेश गुडुळकर, इयत्ता बारावी परीक्षेत यश संपादन केलेल्या सुशांत मारुती गोडसे, हर्षवर्धन अनिल बामणे, सुशील सोमनाथ पाटील, पल्लवी विनायक पुंडपळ, अथर्व संदीप कदम, नेहा बाळासाहेब पाटील, समृद्धी सुनील शिंदे, तुषार सदाशिव कापसे, प्रतिमा तानाजी शिंदे, 

अमरनाथ सचिन सावंत, आशिष आप्पासाहेब कोळवी, साहिल विलास पुंडपळ, तर बीएचएमएस पदवी मिळवल्याबद्दल प्रणाली गणपती भादवणकर, एमबीए पदवी मिळवल्याबद्दल 

शुभांगी मारुती गोडसे, बीइ मेकॅनिकल पदवी मिळवल्याबद्दल सुयोग आनंदराव कुंभार, बीई पदवी मिळवल्याबद्दल सचिता चंद्रकांत जोशी, विजय नरसिंह पाटील, बीएससी पदवी मिळवल्याबद्दल विश्वजीत केंपन्ना कोरे, बीसीएस पदवी मिळवल्याबद्दल श्रीधर तुकाराम जाधव, डीएमई पदवी मिळवल्याबद्दल कार्तिक सुनील पाटील, बी एस सी पदवी मिळवल्याबद्दल विनोद प्रकाश बेटगार, बी टेक आयटी पदवी 

मिळवल्याबद्दल प्रतीक भैरू बामणे, बीबीए पदवी मिळवल्याबद्दल रोहिणी भरमा टक्केकर, बी टेक पदवी मिळवल्याबद्दल स्वप्निल भास्कर पाटील, बीकॉम पदवी मिळवल्याबद्दल अश्विनकुमार रामचंद्र सिताफ, आय ओ टी पदवी मिळवल्याबद्दल श्वेता प्रकाश कुंभार, पी जी एम पदवी मिळवल्याबद्दल दीपक प्रकाश कुंभार, बी ए एम एस पदवी मिळवल्याबद्दल काजल संजीव गोणी, बी टेक आयटी पदवी मिळवल्याबद्दल सुमित सदाशिव कापसे, बी.ई. सिविल पदवी मिळवल्याबद्दल पुनम बाळेश नाईक, बी फार्मसी पदवी मिळवल्याबद्दल आशिष महादेव फुटाणे, बी.ई. सिविल पदवी मिळवल्याबद्दल  दत्तात्रेय अशोक पाटील यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे सर्व सभासद शिक्षक वर्ग व गुणवंत विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुकाराम जाधव यांनी केले. मानपत्राचे वाचन श्रीधर पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कृष्णात पाटील, दिनकर खवरे व राजेंद्र नाईक यांनी केले. आभार नामदेव पाटील यांनी मानले.




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.