Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

औद्योगिक प्रगतीसाठी अभियंत्यांनी संशोधनाला प्राधान्य द्यावे : विजयकुमार आडके

'संत गजानन' अभियांत्रिकीत अभियंता दिन उत्साहात 

महागाव: येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित अभियंता दिना निमित्त सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पुजन करताना महावितरणचे अभियंते विजयकुमार आडके. शेजारी प्राचार्य एस.एस. सावंत,सागर दागंट,प्रा.अमरसिंह फराकटे व इतर मान्यवर.

गडहिंग्लज ( प्रतिनिधी):
भारताच्या औद्योगिक प्रगतीसाठी नवोदित अभियंत्यांनी अधिक वेळ संशोधनासाठी प्राधान्य देऊन येथे लागणारे औद्योगिक साधनसामग्रीची निर्मिती केल्यास परदेशातून आयात थांबवणे शक्य आहे. परिणामी चलनाच्या खर्चात बचत होऊन कौशल्याच्या बळावर देशाला प्रगतीच्या दिशेने झेपावण्यास मदत होईल असे मत महावितरणचे अभियंते विजयकुमार आडके यांनी महागाव (ता. गडहिंग्लज ) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात सर विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभियंता दिन कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

 यावेळी आडके यांनी सध्या भारताने इलेक्ट्रिक क्षेत्रात स्वयंपुर्ण  होण्याला  प्राधान्य दिला आहे. या क्षेत्रात अभियंत्याला संशोधनाला अधिक संधी आहे. तसेच यशस्वी उद्योजक होण्यासाठी सकारात्मक विचार, कल्पकता व प्राधान्यक्रम हे त्रिसूत्री अवलंबून यशस्वी होण्याचे आवाहन  केले.

 स्वागत प्राचार्य डॉ.एस.एच. सावंत यांनी केले. यावेळी विद्युत उपकार्यकारी अभियंता सागर दांगट यांनी प्रशासकीय सेवा व स्पर्धा परीक्षा यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.  महाविद्यालयातील इको क्लबच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले. विविध विभागाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. दरम्यान पॉलीटेक्निक महाविद्यालयात  सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य प्रा. डी. बी.केस्ती यांच्या हस्ते करण्यात आला येथे विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रा. सुशील संकपाळ, प्रा. महादेव बंदी,प्रा. अमरसिंह फराक्टे, प्रा. राहुल देसाई ,प्रा. सचिन मातले, प्रा. आर. एस. पाटील, प्रा. निलजीत माळी ,प्रा. कल्याणी चव्हाण,प्रा. अक्षय देसाई, प्रा. बाळासो जंगली, प्रा. दिलीप लोंढे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. एस. बी. पोवार यांनी  तर आभार प्रा. एस. पी. नारायणकर यांनी मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.