येथील शिवराज सायन्स ॲकॅडमीचे विद्यार्थी सिईटी परीक्षेत यशस्वी झाले. या यशस्वी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात ते बोलत होते. शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रोत्साहनाने सुरू करण्यात आलेल्या सायन्स ॲकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी जेईई व नीट परीक्षेत यशस्वी व्हावे यासाठी सर्वतोपरी सहकार्य संस्थेच्या वतीने करण्याची ग्वाही डॉ. अनिल कुराडे यांनी यावेळी दिली. यावेळी सर्व यशस्वी विद्यार्थी व पालकांचे त्यांनी अभिनंदन केले. सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनात यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये शर्वरी नारायण पाटील (९८.४६), दिक्षा रमेश मोरे (९७.७५), दिव्या राजेंद्र तराळ (९६.२४), पूजा राजू चौगुले (९४.३१), युवराज शिंदे (९३), रेहान असलम नूलकर (९२.०२), निदा अजित पाटील (९१.९२), तेजस्विनी अनिल पारळे (९१.४०), अमन अनिल चव्हाण (९०.०२), प्रतीक्षा अरुण सुतार(९०.०७), तन्मयी अविनाश बोरवाडकर (८८.१०), श्रावणी किशोर पाटील (८८.३४), वैष्णवी अनिल कोंडेकर (८७.७८), किरण बाळासाहेब रावळ( ८५.७१) वैष्णवी मगदूम (८४), पद्मनिश एकनाथ पाटील( ८२.५९), शर्वरी ईश्वर देसाई (८०), विशाल कसाळे (८०), त्रिवेणी नाईक (८०), सिद्धी बनसोडे (७९) टक्के गुण मिळवून यशस्वी झाले. या सर्व विद्यार्थ्यांचे व पालकांचा गौरव सायन्स ॲकॅडमी मार्फत करण्यात आला.
प्रारंभी सायन्स ॲकॅडमी प्रमुख प्रा. संदीप गवळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा. एम.के. नोरेंज, पर्यवेक्षक तानाजी चौगुले यांनी देखील मार्गदर्शन केले. पालक नारायण पाटील यांनी आपल्या अध्यक्ष भाषणातून कृतज्ञता व्यक्त केले. कु. शर्वरी पाटील, दिव्या तराळ, युवराज शिंदे या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, डॉ.संदीप परीट, प्रा. विक्रम शिंदे, प्रा. अश्विनी तेलंग, प्रा.आगा, प्रा. चोरगे यांच्यासह सर्व प्राध्यापक, पालक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. सई पाटील, विठ्ठल पाटील व सई भरत पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
आपले यश ... आपली मेहनत आहे .. सर्व महाराष्ट्र भर आपले कार्य पोहचावे
ReplyDelete