![]() |
कोल्हापूर: माजी सैनिक कुमार पाटील यांना 'भारत गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेत माजी सैनिक कुमार पाटील यांना "भारत गौरव पुरस्कार" प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते कोल्हापुर येथे आयोजित कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
माजी सैनिक कुमार पाटील यांनी कोरोना काळात पोलीसांच्या सोबत दिवस-रात्र केलेली ड्युटी, या कालावधीत ६१ जणांनी केलेले रक्तदान, त्याचबरोबर घरचा कर्ता पुरुष अपघाती किंवा इतर कारणास्तव मयत झाल्यास जय जवान जय किसान फौंडेशन गडहिंग्लजच्या वतीने यथाशक्ती आर्थिक स्वरूपात केलेली मदत, तसेच शहीद परिवारासाठी सन्मान सोहळ्याचे आयोजन आदी कामांची दखल घेत माजी सैनिक कुमार पाटील यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.