गडहिंग्लज (प्रतिनिधी): सामानगड येथील श्री.भिमशाप्पा मठ येथे दिनांक २५ सप्टेंबर पासून दसरा सप्ताह निमित्त विविध कार्यक्रम संपन्न होत आहेत. अशी माहिती मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी दिली आहे.
रविवार दिनांक २५ सप्टेंबर रोजी ठीक दुपारी १ वाजता घटस्थापना व विनापूजन, रात्री ठीक दहा वाजता हसुरसासगिरी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, दुसऱ्या दिवशी रात्री १० वाजता चिंचेवाडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, तिसऱ्या दिवशी नौकूड ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा.
चौथ्या दिवशी येणेचवंडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, पाचव्या दिवशी खमलेहट्टी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, सहाव्या दिवशी हसुरवाडी ग्रामस्थ मंडळ यांचे भजन व पहारा, सातव्या दिवशी शनिवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी सप्ताह समाप्ती आणि दुपारी १२ नंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रसादाचा पंचक्रोशीतील सर्व भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन मठातर्फे भिमशाप्पा दिवटी यांनी केले आहे.