हसुरसासगिरी: येथील जीवन विद्या मंदिरात शहीद नायब सुभेदार आप्पाजी मारुती कदम यांच्या स्मृतिपित्यर्थ शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवर.
गडहिंग्लज( प्रतिनिधी): हसुरसासगिरी येथील जीवन विद्या मंदिरात शहीद नायब सुभेदार आप्पाजी मारुती कदम यांच्या स्मृतिपित्यर्थ शैक्षणिक साहित्य वितरण करण्यात आले. १७ सप्टेंबर १९९६ रोजी हसूरसासगिरी गावचे सुपुत्र शहीद नायब सुभेदार आप्पाजी मारुती कदम यांना नागालँड येथे दहशतवाद्यांकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात वीरगती प्राप्त झाली.आज या घटनेला २६ वर्ष पूर्ण होत आहेत.
सासगिरीतील कदम कुटुंबीय यांचेकडून शाळेतील व अंगणवाडीतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्य व स्नेहभोजन देण्यात आले.गेली २६ वर्ष कदम कुटुंबीयांनी हा वसा व वारसा जपला आहे.
यावेळी शहीद नायब सुभेदार आप्पाजी कदम यांच्या हुतात्मा स्मारकाला मानवंदना देण्यात आली. जीवन शिक्षण विद्या मंदिर येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी गडहिंग्लज तालुक्यातील शहीद जवानांच्या स्मृती प्रित्यर्थ मधुकर येसने लिखित "स्मृतिगंध" या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. या पुस्तकाचे लेखक मधुकर येसने ,प्राथमिक शिक्षक बँकेचे नूतन संचालक नंदकुमार वाईंगडे ,अखिल भारतीय मराठा महासंघाचे गडहिंग्लज तालुका अध्यक्ष आप्पा उर्फ सुधीर शिवणे, जय जवान जय किसान फाउंडेशनचे अध्यक्ष कुमार पाटील, गडहिंग्लज तालुका सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुबराव पाटील यांना शहीद नायब सुभेदार अप्पाजी कदम यांच्या स्मृतिपित्यर्थ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
तसेच १५ मराठा बटालियन माजी सैनिक संघटनेचे ऑर्डिनरी कॅप्टन पांडुरंग पाटील, हवालदार दत्तात्रय मगदूम, शिवाजी पाटील,प्रकाश चव्हाण,शंकर पवार,मारुती परीट,अप्पा रेडेकर राजेंद्र कांबळे, विजय बिरंजे, सरपंच सौ. शांता कदम, सौ. जयश्री जाधव पोलीस पाटील हसूरसासगिरी व शाळेचे मुख्याध्यापक यांना स्मृतिगंध या पुस्तकाचे वितरण करण्यात आले यावेळी शाळेतील व अंगणवाडीतील सर्व मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी पांडुरंग पाटील,नेते सुभाष निकम, नंदकुमार वाईंगडे, विष्णुपंत कदम,कार्यक्रमाचे अध्यक्ष मधुकर येसने यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक शश्रीकांत कल्लोळे यांनी तर सूत्रसंचालन विद्यामंदिर तेगिनहाळ शाळेचे अध्यापक अयाज बागवान यांनी केले. आभार विठ्ठल कदम यांनी मानले.