![]() |
गडहिंग्लज: स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करताना डॉ.समिधा चौगुले, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे व अन्य मान्यवर. (छाया: मज्जीद किल्लेदार) |
गडहिंग्लज(प्रतिनिधी) : येथील शिवराज महाविद्यालयाच्या सुकन्या युथ फेस्टिवल आयोजित झिम्मा-फुगडी स्पर्धेत शिवराज ग्रुप प्रथम, द्वितीय रमा-माधव ग्रुप तर हिरकणी ग्रुपने तृतीय क्रमांक पटकाविला. या स्पर्धेतील विजेत्यांना डॉ.समिधा चौगुले, शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, प्रा.पौर्णिमा कुराडे व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचा शुभारंभ पर्यावरणपूरक गणेश उत्सव विजेत्या शैलेजा सुतार यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम तर शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. स्वागत व प्रास्ताविक प्रा.पौर्णिमा कुराडे यांनी केले. यावेळी प्रमुख अतिथी शैलेजा सुतार यांनी आपल्या भाषणातून महाराष्ट्राच्या पारंपारिकतेला तोड नाही. सण-उत्सवाच्या माध्यमातून आपली संस्कृती जपण्याचा प्रयत्न होतो आहे. महाराष्ट्र संस्कृतीचा हा वारसा आजही टिकून आहे. झिम्मा-फुगडीच्या माध्यमातून महिला पारंपारिक वेशभूषेने नटलेल्या असतात. पारंपारिकतेचा हा वारसा महिलांनी असाच पुढे चालू ठेवावा असे आवाहन त्यांनी केले.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ.अनिल कुराडे यांनी या झिम्मा-फुगडीच्या माध्यमातून भगिनींच्या जुन्या आठवणीना उजाळा मिळतो. आजच्या नव्या पिढी मध्ये सन उत्सवाच्या माध्यमातून नव्याची नवलाई आणि जुन्या परंपरा यांचा सुंदर असा मेळ घडवून आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. सुकन्या युथ फेस्टिवल प्रमुख प्रा.बिनादेवी कुराडे यांनी सुकन्या युथ फेस्टिवलच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. प्राचार्य डॉ.एस.एम.कदम यांनी अध्यक्षीय भाषण केले.
![]() |
यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, शिवराज इंग्लीश स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ.गौरी शिंदे यांच्यासह विद्या संकुलातील सर्व स्टाफ व विद्यार्थिनी उपस्थित होते.
या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सौ.पौर्णिमा कुराडे, डॉ.श्रद्धा पाटील यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापिका, सर्व प्रशासकीय महिला कर्मचारी यांनी परिश्रम घेतले . स्पर्धेचे परीक्षण प्रा.आशा पाटील, प्रा.एस.ए.जांगनुरे, प्रा.अनिता पोवार यांनी केले. प्रा.श्रुती पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रा.सुप्रिया व्हटकर यांनी मानले. या झिम्मा-फुगडीतून पारंपारिक गौरी गीतांचा जागर स्पर्धकांनी केला.