गडहिंग्लज(प्रतिनिधी):येथील माजी उपनगराध्यक्ष, महालक्ष्मी यात्रा कमिटीचे अध्यक्ष, श्री संत बाळूमामा व श्री हालसिध्दनाथ मंदिर संस्थानचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांचा वाढदिवस "वाढदिवस गौरव समितीच्या" वतीने श्री महालक्ष्मी मंदिरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून गोड साखरचे माजी व्हाइस चेअरमन प्रकाशराव चव्हाण होते तर नूल येथील रामनाथगिरी समाधी मठाचे मठाधीपती भगवानगिरी महाराज अध्यक्षस्थानी होते.
यात्रा कमिटीचे उपाध्यक्ष बसवराज आजरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सचिव,माजी नगरसेवक चंद्रकांत सावंत, शिवराज विद्या संकुलचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे, माजी नगरसेवक दिलीप माने, वीरशैव समाजाचे अध्यक्ष राजशेखर दड्डी, श्री देवी महालक्ष्मी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र तारळे, खोत गुरुजी, ज्योतिर्लिंग शिक्षण संस्थेचे प्रमुख रियाजभाई शमनजी यांची शुभेच्छापर भाषणे झाली.
श्री महालक्ष्मी देवीच्या चा़ंदीच्या पालखीसाठी तीन किलो चांदी दिल्याबद्दल रियाजभाई शमनजी यांचा भगवानगिरी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. दरम्यान, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील,उदयराव जोशी, मारुती मंदिर जिर्णोद्धार समितीचे अध्यक्ष अरविंद कित्तूरकर , आर्किटेक्ट इंजिनियर्स असोसिएशन व लाल आखाडा तालीम मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रिंगणे यांचा सत्कार केला.
सत्काराला उत्तर देताना रमेश रिंगणे म्हणाले,गडहिंग्लजने मला कायमच भरभरून प्रेम दिले.जनतेच्या प्रचंड विश्वासावर पंच , मानकरी, हक्कदार यांच्या सहकार्याने श्री महालक्ष्मीची यात्रा यशस्वी करू शकलो.लोकवर्गणीतून श्री संत बाळू मामाचे दिड कोटीचे मंदिर साकारले आहे.
श्री महालक्ष्मी देवीच्या चांदीच्या पालखीचे काम प्रगतीपथावर आहे. जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे माजी अपारंपारिक ऊर्जा आणि फलोत्पादन मंत्री, आमदार डॉ.विनयरावजी कोरे आणि प्रकाशराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज नगरपालिकेचा पाच वर्षे नगरसेवक ते उपनगराध्यक्ष म्हणून स्वच्छ आणि सचोटीने कारभार करण्याची स़ंधी मिळाली. सत्काराबद्दल मी सर्वांचाच ऋणी राहीन. इथून पुढेही जनतेच्या सेवेसाठी कटीबध्द असल्याचे सांगितले.
कार्यक्रमास सुधीर पाटील ( खातेदार), पंच राजू पोवळ, आप्पासाहेब बस्ताडे, जयसिंग पोवार, अर्जून भोईटे, रावसाहेब कुरबेट्टी, अरविंद पाटील, संजय खोत ,माजी नगरसेवक बाळासाहेब गुरव, दिपक पाटील, शिवराज विद्या संकुलचे सचिव प्रा.अनिल कुराडे, आण्णासाहेब देवगोंडा, बाळासाहेब सुतार, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.दिनकर खवरे यांनी सुत्रसंचलन केले तर उपाध्यक्ष विठ्ठल भमानगोळ यांनी आभार मानले.