गावातील ३०० जनावरांना दिली लस
गडहिंग्लज (प्रतिनिधी): तेरणी गावातील जनावरांना 'लम्पी स्किन' आजारावर गोकुळ दूध संघाच्या वतीने मोफत लसीकरण करण्यात आले. लसीकरणासाठी गावातील पशुपालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी गाय, म्हैस व बैल अशा एकूण ३०० जनावरांना लस टोचण्यात आली.
![]() |
तेरणी: येथे जनावरांना 'लम्पी स्किन' आजारावर लसीकरणावेळी सरपंच मोसीम मुल्ला, सदस्य करवीर उथळे यांच्यासह शेतकरी बांधव व पशुवैद्यकीय विभागाची टीम. |
लसीकरणासाठी गावातील सर्व दूध संस्था कर्मचारी, सरपंच मोसीम मुल्ला, सदस्य करवीर उथळे, ग्रामपंचायत सर्व पदाधिकारी, गोकुळ दूध संघाचे हलकर्णी विभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर पाटील, हणमंत पाटील, बसू अगसगी, गंगाराम आलकनूर, प्रशांत संती, विठ्ठल जाधव व इतर ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.