गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात बी.कॉम इंग्रजी माध्यम व आय.टी विभागाच्यावतीने शिक्षक दिन संपन्न झाला. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम तर संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे व प्रा.सौ.बिनादेवी कुराडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व महात्मा जोतीबा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत व प्रास्ताविक कु.बनश्री कोरी यांनी केले.
![]() |
| गडहिंग्लज: शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रा. सौ.बिनादेवी कुराडे. |
या कार्यक्रमात संस्थेचे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनात म्हणाले, शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची खरी जडणघडण होत असते. त्यांनी दिलेल्या योगदानातून विद्यार्थी घडत असतो. त्यांनी समाजासाठी केलेला त्याग हा अत्यंत महत्वाचा आहे. शिक्षक व विद्यार्थी यांच्यात दृढ असे नाते असावे. शिक्षक हा विदयार्थ्यांच्या जीवनाचा मार्गदर्शक आहे. विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोनातून वाटचाल करणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.
![]() |
| गडहिंग्लज: शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्राचार्य डॉ. एस.एम.कदम. |
प्रा.सौ.बिनादेवी कुराडे, प्राचार्य डॉ.एस.एम.कदम, समन्वयक डॉ.महेश चौगुले, प्रा.डी.पी.खेडकर, प्रा.नाझिया बोजगर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
![]() |
| गडहिंग्लज: शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
या कार्यक्रमास प्रा.एस.ए.जाधव, डॉ.बी.एम.जाधव, डॉ.वृषाली हेरेकर, प्रा.प्रमोद होनगेकर, प्रियांका पाटील यांच्यासह प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु, भाग्यश्री रेडेकर, कु. गायत्री नाईक यांनी केले तर आभार कु.समृद्धी पोवार यांनी मानले.




