🔘कारवे येथे भव्य पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन
🔘युवा नेते व आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील, बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांची उपस्थिती
🔘बेरड समाजाच्या पाठीशी आपण हिमालयासारखे उभे राहू: युवा नेते श्रीशैल पाटील
चंदगड : चंदगड तालुक्यात विविध कार्यक्रम व उपक्रम घेत आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कारवे येथे जयंतीनिमित्त जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विनायक उर्फ आप्पी पाटील यांच्या सौजन्याने साकारण्यात आलेल्या भव्य पूर्णकृती पुतळ्याचे पूजन आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान, शिवाजीराव पाटील यांनीही उपस्थित राहत नरवीर उमाजी नाईक यांना अभिवादन केले.
दरम्यान,दुपारी बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक, आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील, मारुती नाईक, राजेंद्र नाईक, संतोष पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला.यावेळी नेते बाळेश नाईक, श्रीशैल पाटील, राजेंद्र नाईक यांनी मार्गदर्शन केले.
![]() |
| कारवे: येथे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष विनायक उर्फ आप्पी पाटील यांच्या सौजन्याने उभारण्यात आलेला आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांचा भव्य पूर्णकृती पुतळा. |
बेरड समाजाच्या पाठीशी आपण हिमालयासारखे उभे राहू अशी ग्वाही युवा नेते श्रीशैल पाटील यांनी यावेळी दिले. समाजाच्या विविध अडीअडचणी प्राधान्याने सोडविण्याचा प्रयत्न आपण करू. यापुढे युवकांनी समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
![]() |
| कारवे: येथे कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ, मान्यवर व समाज बांधव. |
यावेळी प्रा. मधुकर जाधव यांचे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्यावर आधारित व्याख्यान झाले. यावेळी मार्गदर्शन करताना प्रा. जाधव म्हणाले, आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती म्हणजे हा त्यांच्या विचारांचा जागर म्हणावा लागेल. उमाजी नाईक हे ब्रिटिशांविरोधात बंड पुकारत ब्रिटिशांना त्यांनी 'सळो की पळो' करून सोडले.
![]() |
| कारवे: येथील कार्यक्रमात बोलताना प्रा. मधुकर जाधव. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर. |
उमाजी नाईक हे गोरगरिबांचे वाली होते. स्वातंत्र्य काळात ब्रिटिशांना आव्हान देणारा हा पहिला नेता होता. ब्रिटिशांच्या विरोधात जाहीरनामा काढण्याचे धाडस उमाजी यांनी केले. ब्रिटिशांच्या मनात त्यांनी धडकी भरवली होती. उमाजी नाईक यांनी स्वातंत्र्याची मशाल पेटवली. ब्रिटिशांनी उमाजी नाईक यांची धास्ती घेतली होती. उमाजी राजे हे मर्यादित नसून ते अखिल भारताचे राजे आहेत. त्यांच्या या शौर्याचा इतिहास व त्यांच्या विचारांचा जागर सर्वत्र झाला पाहिजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
यावेळी जयंती निमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये दर्शक गुंडू नाईक, निकिता सुरेश चिंचणगी, प्रतिभा आप्पाणा चिंचणगी, आदेश मारुती नाईक, दीक्षा मारुती तरवाळ, सौरभ धोंडीबा नाईक, आरती पुंडलिक नाईक, साहिल कृष्णा नरी, पल्लवी शिवाजी आपके, सोनाली गोविंद कांबळे, मधुरा जगदीश दुकळे, परशराम भागाणा नाईक, शिवाजी वैजनाथ राऊत, दामिनी संजय सुळेभावकर, सलोनी विठ्ठल नार्वेकर, स्वरा बाळाराम नाईक, कलमेश भरमाणा नाईक, सम्राज्ञी विजय चाळूचे, विराज तानाजी नाईक या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या कार्यक्रमास ब्रह्मा नाईक, आप्पाजी चाळूचे, बी.के.नाईक, रमेश नाईक, बाळाराम नाईक, अनिल नाईक, संजय नाईक, सुरज कानूरकर, राजू चाळूचे, गोविंद नाईक, राजू नाईक, तानाजी नाईक, अर्जुन चाळूचे, अर्जुन नाईक, मारुती नाईक यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार नींगाप्पा बोकडे यांनी केले. आभार प्रा. विलास नाईक यांनी मानले.
चनेट्टी येथे आमदार राजेश पाटील यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
![]() |
| चनेट्टी: आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन करताना आमदार राजेश पाटील. |
चंदगड :चनेट्टी येथे आद्य क्रांतिवीर नरवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिमेचे पूजन व फलकाचे अनावरण आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच,ग्रा.प सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






