🔘आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
🔘मोटरसायकल रॅलीमध्ये युवकांचा उत्स्फूर्त सहभाग
🔘आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या शौर्याचा व विचारांचा तालुक्यात जागर
🔘 काळामवाडी येथे दांडिया खेळत महिलांकडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने अभिवादन
🔘तालुक्यात विविध कार्यक्रम व उपक्रमाद्वारे आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांना अभिवादन
प्रारंभी सकाळी किल्ले सामानगड येथे विविध गावातून करण्यात आलेल्या ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. या ठिकाणी खणदाळ, कडलगे, बसर्गे, दुंडगे, मुत्नाळ, चनेकुपी, भडगाव येथील युवक हातात झेंडे घेऊन मोटरसायकल रॅलीने किल्ले सामानगडावर दाखल झाले होते. यावेळी आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांचा जयघोष करण्यात आला.
![]() |
| किल्ले सामानगड: मार्गदर्शन करताना बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक. यावेळी उपस्थित राजेंद्र नाईक, मारुती नाईक, संतोष पाटील, विजय नाईक,विजय लक्यानावर, रामू नाईक यांच्यासह इतर. |
यावेळी युवकांच्यामध्ये एक प्रकारचा उत्साह दिसून येत होता. उत्स्फूर्तपणे युवकांनी या रॅलीमध्ये सहभाग नोंदविला. त्यानंतर बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले सामानगडावर विविध गावातून आणण्यात आलेल्या ज्योती प्रज्वलित करण्यात आल्या. यावेळी नरवीर उमाजी नाईक यांच्या जयघोषाने किल्ले सामानगडचा परिसर दणाणून गेला.
नेते बाळेश नाईक, शिक्षक राजेंद्र नाईक यांनी आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या शौर्याचा इतिहास सांगितला. यापुढे समाजातील युवकांनी समाज प्रबोधनाचे काम मोठ्या नेटाने करावे. समाज संघटित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन नेते बाळेश नाईक यांनी केले. यावेळी संतोष पाटील, मारुती नाईक, बाबुराव नाईक, रामू नाईक, विजय लक्यानावर, महेश नाईक यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
किल्ले सामानगडावरून प्रज्वलित करण्यात आलेल्या ज्योती चिंचेवाडी, भडगाव मार्गे गडहिंग्लज शहरात नेण्यात आल्या. येथे मोटरसायकल रॅलीने शिवाजी चौकात ह्या ज्योती आणण्यात आल्या. या ठिकाणीही नरवीर उमाजी नाईक यांचा जयघोष करण्यात आला.
शिवाजी चौकात नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन माजी उपनगराध्यक्ष महेश उर्फ बंटी कोरी, आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील, ज्येष्ठ पत्रकार जगदीश पाटील, भडगावचे माजी पोलीस पाटील भीमराव पाटील, भीमराव पट्टणकुडी, वसंत नाईक, मारुती नाईक, संतोष पाटील, बाबू नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमीचा व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा👇
भडगावमध्ये नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी
![]() |
| भडगाव: येथे जयंती प्रसंगी उपस्थित आप्पी पाटील युवा मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील, बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक, भीमराव पाटील, भीमराव पट्टणकुडी, दयानंद पट्टणकुडी, वसंत नाईक यांच्यासह इतर. |
भडगाव : येथील बेरड नाईक समाजाच्या वतीने आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. किल्ले सामानगड येथून मिरवणुकीने ज्योत आणण्यात आली. त्यानंतर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन आप्पी पाटील युवा मंच मंचचे अध्यक्ष श्रीशैल पाटील व माजी पोलीस पाटील भीमराव पाटील यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी बेरड समाजाचे नेते व पंचायत समितीचे माजी सदस्य बाळेश नाईक, भीमराव पट्टणकुडी, रविराज चिलमी, विजय नाईक, महेश नाईक, युवराज पट्टणकुडी,केंपांना कतगार, विठ्ठल नाईक, राजेंद्र पाटील, सुरज चिलमी, उमेश नाईक ग्रामपंचायत सदस्य महेश कांबळे, जावेद मुल्ला, राजू चौगुले, वसंत नाईक यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
काळामवाडी : येथेही आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी जि.प. सदस्य हेमंत कोलेकर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
![]() |
| काळामवाडी: येथे आद्य क्रांतिवीर नरवीर उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त दांडिया खेळत आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करताना महिलावर्ग. |









