प्रारंभी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन सामाजिक कार्यकर्ते बाळेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. बॉटनी विभाग प्रमुख प्रा.जयकुमार सरतापे यांनी स्वागत करून प्रास्ताविकात आद्य क्रांतिवीर उमाजी नाईक यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास स्पष्ट केला. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते व बेरड समाजाचे नेते बाळेश नाईक यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांनी इंग्रजाविरुद्ध केलेले बंड दुर्लक्षित केले गेले आहे. त्यांनी इंग्रजांना सळो कि पळो करून आपल्या कार्यातून तत्कालीन समाजाला न्याय देण्याचे महान कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची प्रेरणा सर्वांनी घ्यावी असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी संस्थेचे सचिव प्रा.अनिल कुराडे यांनी नाईक समाज निष्ठापूर्वक कार्य करणारा समाज आहे. आपल्या कार्यात एकनिष्ठता जपणारे कार्य या समाजाकडून सतत घडत आले आहे. याची नोंद समाजाच्या पटलावर होणे आवश्यक आहे. राजे उमाजी नाईक यांच्या कार्याचा वारसा सर्वांनी जपावा असे आवाहन डॉ.अनिल कुराडे यांनी व्यक्त केले. डॉ. एस. एम. कदम, राजेंद्र नाईक यांनीही सर्वांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास प्रा. सौ. बिनादेवी कुराडे, पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले, प्रा.संकेत पाटील, नॅकचे समन्वयक प्रा. किशोर अदाटे, मारुती नाईक, संतोष पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


