मुसळधार पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली
हुक्केरी : बेळगाव जिल्ह्यात गेले चार दिवस संततधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यातील नद्या आणि जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. हुक्केरी तालुक्यातही मुसळधार पाऊस सुरू असून तालुक्यातील बहुतांश पूल पाण्याखाली गेले आहेत दरम्यान, हिडकल येथील जलाशय पूर्ण क्षमतेने भरला आहे.
संततधार पावसामुळे हुक्केरी तालुक्यातील घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून हिडकल जलाशय पूर्ण क्षमतेने भरले आहे.या पार्श्वभूमीवर रविवारी पाटबंधारे अधिकाऱ्यांनी जलाशयाच्या दहा गेटमधून सुमारे 20 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला.हुक्केरी-येरनाळ, घोडगेरी-नेगिना, गोकाक-लोळसुर पुलांवर पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली आहे.