गडहिंग्लज ( प्रतिनिधी): येथील संभाजीराव माने ज्युनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना गणवेश प्रदान कार्यक्रम संपन्न झाला.अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून गडहिंग्लज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल दिवसे व पोलीस हवालदार सुतार मॅडम उपस्थित होते.
स्वागत व प्रस्ताविक पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले यांनी केले. गडहिंग्लज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल दिवसे यांनी विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी शिस्तबद्ध राहिले पाहिजे. आपले आई-वडील व सर्व वडीलधाऱ्यांचा आदर केला पाहिजे. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी आतापासूनच कष्ट करण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. आपणासह आपल्या सोबत सर्वांना घेऊन आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
![]() |
| गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल दिवसे. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
पोलीस हवालदार सुतार मॅडम यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्यात समानता असली पाहिजे यासाठी आपल्या महाविद्यालयाने ही समानता जपण्याचा प्रयत्न केला आहे. हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा.किसनराव कुराडे यांनी आजच्या आधुनिकीकरणामध्ये सर्वच क्षेत्रात स्रिया झेपावत आहेत. त्यांच्या कला आणि प्रयत्नाला बळ देण्याची गरज आहे. स्री-पुरुष हा भेदभाव आता कुठेच राहिलेली नाही. महाविद्यालयात ड्रेसकोडच्या माध्यमातून समानता जपण्याचा हा उपक्रम हा खरोखरच स्तुत्य आहे. यातून एक प्रकारची शिस्त लागते व चांगले प्राप्त करण्याची जबाबदारी आपल्यावर येते यातून खूप काही करण्याची जिद्द प्राप्त होते. यासाठी विद्यार्थ्यांनी स्वत:ला सिद्ध करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
![]() |
| गडहिंग्लज: येथील शिवराज महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे. (छाया मज्जिद किल्लेदार) |





