🔘एकाच दिवसात काढली तब्बल १०० खाती
🔘अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक
![]() |
गडहिंग्लज: जिल्हा बँकेच्या यशवंत रिकरिंग लखपती ठेव योजनेच्या शुभारंभ प्रसंगी गडहिंग्लज शहर शाखेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग. |
गडहिंग्लज( प्रतिनिधी):जिल्हा बँकेच्या गडहिंग्लज शहर शाखेने यशवंत रिकारिंग ठेव योजनेअंतर्गत एकाच दिवशी तब्बल १०० खाती उघडून जिल्ह्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे. या बद्दल कौतुक होत आहे. आज अखेर एकूण या योजनेची १६५ खाती झाली आहेत.
जिल्हा बँकेच्या गडहिंग्लज शहर शाखेच्या कर्मचाऱ्यांनी विभागीय अधिकारी नानासो कागवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशवंत रिकरिंग लखपती ठेव योजनेचे सर्व फॉर्म स्वतः शाळेत जाऊन भरण्यात आली व या योजनेचे पासबुक शाळेत जाऊन पोहोच करण्यात आली. विभागीय अधिकारी नानासो कागवाडे यांच्या प्रयत्नातून गडहिंग्लज तालुका सचिवांची ४० खाती यशवंत रिकरिंग ठेवची मिळाली आहेत. या योजनेचे पासबुक संबंधितांना यावेळी वितरित करण्यात आले. या ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी विभागीय अधिकारी नानासो कागवाडे, विकास जगताप, व्यवस्थापक शिवाजी घोरपडे, शाखा व्यवस्थापक दिलीप शिंदे, तानाजी भुजवडकर, अमोल काळेबेरे, विकास नवाळे, संजय आदमापुरे, रामचंद्र जाधव उपस्थित होते.