🔘शिवराज विद्या संकुलात वाढदिवसानिमित्त स्नेहमेळावा उत्साहात
🔘आमदार राजेश पाटील, माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांची उपस्थिती
🔘शिवराज फाउंडेशनच्या लोगोचेही अनावरण
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलाचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवराज विद्या संकुलमध्ये स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. या स्नेह मेळाव्यास आमदार राजेश पाटील व माजी मंत्री भरमूअण्णा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी नूल येथील रामनाथगिरी मठाचे भगवानगिरी महाराज होते. प्रारंभी स्वागत व प्रस्ताविक बसवराज आजरी यांनी केले. यावेळी शिवराज फाउंडेशनच्या लोगोचे अनावरण आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवराज विद्या संकुल व शिवराज फाउंडेशनच्या वतीने ॲड. दिग्विजय कुराडे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
माजी मंत्री भरमूअण्णा पाटील म्हणाले, निष्ठेपुढे कोणतीच ताकद चालत नाही. गडहिंग्लज सारख्या सदन तालुक्यामध्ये शिवराजच्या माध्यमातून चाललेले शैक्षणिक कार्य बहुमोल आहे. या भागातील अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याच्या कार्यात शिवराजचा वाटा मोलाचा असल्याचे स्पष्ट करून त्यांनी ॲड. दिग्विजय कुराडे यांचे अभिष्टचिंतन केले.
शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉ. अनिल कुराडे, गडहिंग्लज पंचायत समितीचे माजी सदस्य अमर चव्हाण, आजराचे माजी सभापती विष्णुपंत केसरकर, एल. टी.नवलाज, राजगोंड पाटील, उदयकुमार देशपांडे, अभयसिंह देसाई व अन्य मान्यवरांनी आपल्या भाषणातून ॲड. दिग्विजय कुराडे यांना शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना ॲड. दिग्विजय कुराडे म्हणाले, शिवराज फाउंडेशनच्या माध्यमातून राजकारण विरहित कार्य या भागातील सर्वांसाठी केले जाणार आहे. मी माझ्या परीने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत आहे. केलेल्या कोणत्याही कामाचा ऊहापोह न करता इथून पुढेही असेच कार्य समाजासाठी करीत राहीन, यासाठी मला सर्वांचे आशीर्वाद व पाठिंबा सतत लाभावा असे आवाहन त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणातून भगवानगिरी महाराजांनी ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या वाटचालीला शुभेच्छा दिल्या व अभिष्टचिंतन केले. यावेळी शिवराज फाउंडेशनच्या माध्यमातून आयुष्य कोरी याच्या उपचारासाठी आर्थिक मदत करण्यात आली. शुभेच्छांप्रति "एक वही.... भविष्य घडवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी" हा विधायक उपक्रम राबविण्यात आला. यासाठी दीड हजार वह्या संकलित झाले आहेत. यावेळी ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी यात्रा कमिटीच्या वतीने व विविध मान्यवरांनी व विविध संस्थानी शुभेच्छा दिल्या.
ॲड. दिग्विजय कुराडे यांचे अभिष्टचिंतन करण्यासाठी गारगोटीचे माजी आमदार बजरंगअण्णा देसाई, विक्रम चव्हाण पाटील, चंदगड, प्रकाश चव्हाण, माजी जि. प.सदस्य हेमंत कोलेकर, सदानंद हत्तरकी, प्रकाश पताडे, अभिषेक शिंपी, पांडुरंग लोंढे, जे. बी. बारदेस्कर, शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, उपाध्यक्ष जे.वाय.बारदेस्कर, के.जी.पाटील, प्राचार्य डॉ. एस.एम.कदम, बाळासाहेब पाटील, रमेश रिंगणे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेंद्र गड्यानावर, श्री.नंदनवाडे गुरुजी, राजू मांडेकर, जयसिंगराव चव्हाण, उत्कर्ष तरुण मंडळाचे राजू कुलकर्णी, अजित चोथे यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते, परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, वकील संघटनांचे पदाधिकारी, विविध गावातील बहुसंख्य कार्यकर्ते तसेच शिवराज विद्या संकुलाचे पदाधिकारी, प्राध्यापक प्रशासकीय सेवक आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. अशोक मोरमारे, डॉ. श्रद्धा पाटील यांनी केले. आभार पर्यवेक्षक प्रा. तानाजी चौगुले यांनी मानले.