🔈केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची माहिती
🔈गुजरातमधल्या अमरेली येथे सहकार संमेलनला केले संबोधित
केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले...
🔘देशातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहकार मंत्रालयाची निर्मिती केली
🔘या माध्यमातून देशातील कोट्यवधी शेतकरी समृद्ध करण्याचे काम
🔘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीवर अधिक भर दिला आहे
🔘सेंद्रिय उत्पादनांमुळे आपल्या देशाला आणि जगभरातील लोकांना निरामय आरोग्य लाभेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दरही मिळेल
नवी दिल्ली( सौजन्य: पीआयबी): अधिक उत्पादन देणाऱ्या बीजांच्या निर्मितीसाठी बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करणार असल्याची माहिती केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी दिली. गुजरात मधल्या अमरेली येथे सहकार संमेलन- अमरेली जिल्ह्यातील प्रमुख सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्योद्योग मंत्री परषोत्तम रूपाला यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री अमित शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "सहकारातून समृद्धी" ही संकल्पना देशासमोर मांडली आणि त्यासाठी सहकार मंत्रालयाची स्थापना करून कोट्यवधी शेतकऱ्यांना समृद्ध बनवण्याच्या दृष्टीने नवीन प्रयत्नांची मुहूर्तमेढ रोवली. सहकाराचा अर्थ आहे एकत्र येणे, एकत्र विचार करणे, एकत्रितरीत्या संकल्प करणे आणि संकल्प सिद्धीसाठी एकत्रितपणे प्रयत्न करणे. सरकार एक नवीन सहकार धोरण आणण्याच्या दृष्टीने कार्य करत असून या धोरणामुळे सहकार क्षेत्राशी आरोग्य, विमा, वाहतूक, पर्यटन इत्यादी गोष्टी जोडल्या जातील. सध्याच्या प्रशिक्षण यंत्रणेत सहकार धोरणासह सहकार विद्यापीठाची स्थापना करून सर्वांपर्यंत हे प्रशिक्षण पोहोचवण्याचे कामही केंद्र सरकार करणार असून त्यासाठी पंतप्रधानांनी ५५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे असेही मंत्री शहा यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नैसर्गिक शेतीवर अधिक भर दिला आहे. सेंद्रिय उत्पादनांमुळे आपल्या देशाला आणि जगभरातील लोकांना निरामय आरोग्य लाभेल आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला दरही मिळेल. या उत्पादनांच्या प्रमाणीकरणासाठी आम्ही अमूल आणि इतर पाच सहकारी संस्था मिळून बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही संस्था प्रत्येक राज्यात एक प्रयोगशाळा स्थापन करेल आणि शेतातील मातीचे परीक्षण करून अमूल सेंद्रिय प्रमाणपत्र प्रदान करून नफा थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. याशिवाय अधिक उत्पादन देणाऱ्या बीजांच्या निर्मितीसाठी देखील बहुराज्यीय सहकारी सोसायटी स्थापन करण्यात येणार आहे.
आज जगभरात कृषी उत्पादनांना खूप चांगले मूल्य मिळत आहे, मात्र त्याचा लाभ शेतकरी आणि मंडळांना मिळण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. मोठमोठ्या कंपन्या हा सगळा नफा घेत आहेत. म्हणूनच बहुराज्यीय सहकारी संस्था स्थापन करणार आहोत असेही केंद्रीय मंत्री शहा यांनी सांगितले.