कुंबळहाळ : कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपणप्रसंगी सरपंच सचिन कांबळे, कृषीकन्या यांच्यासह शेतकरी.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): कुंबळहाळ येथे ग्रामीण जागरूकता व कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या अंतिम सत्रातील कृषीकन्यांनी विविध उपक्रमानी कृषी सप्ताह उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कृषी सहाय्यक अमित शिंदे यांनी सोयाबीन रोग व किड नियंत्रण, कुक्कुटपालन योजना, पिक व अवजारे कर्ज,गांडूळ खताचे फायदे,खरीप व रब्बी हंगामात घ्यावयाची पिके याविषयी मार्गदर्शन केले. कृषी सप्ताह निमित्त वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्रा. यु. एस. मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषीकन्या निकिता गावडे, शशिकला खतकर, धनश्री पाटील, आकांक्षा सायमोते, प्राची पोवाळकर, मनस्वी कुंभार यांनी केले. यावेळी सरपंच सचिन कांबळे, उपसरपंच गणपती पाटील,कृषी सहाय्यक अमित शिंदे,पोलीस पाटील कलाप्पा कांबळे, माजी सरपंच यशवंत पाटील, बाळासो येणेचवंडी, मुख्याध्यापिका जन्नत कमते , काडप्पा पाटील, शंकर कांबळे, विद्यार्थी, शिक्षक व शेतकरी उपस्थित होते.