चंद्रशेखर गुरुजींच्या मारेकऱ्यांना रामदुर्गमधून अटक
July 05, 2022
0
बेळगाव : 'सरळ वास्तु' चे प्रसिद्ध ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांच्या हत्याप्रकरणी बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून दोघा मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हे दोघेही मारेकरी चंद्रशेखर गुरुजींचे निकटवर्ती असल्याचे समजते. गुरुजींना मारणारे हे मारेकरी यापूर्वी त्यांच्याकडे काम करत असल्याचे आढळून आले आहे. हत्या झाल्यानंतर पोलिसांनी ताबडतोब सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेत तातडीने नाकाबंदी करत मारेकऱ्यांची युद्धपातळीवर शोध मोहीम राबवली. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग येथून या दोन्हीही मारेकऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे करण्यात आली याचे नेमके कारण पोलीस तपासात आता उघड होणार आहे.