हुबळी : कर्नाटकासह महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश यासह अनेक राज्यात वास्तू मार्गदर्शनाबाबत मोठी ख्याती असणारे प्रख्यात वास्तु ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची मंगळवारी हुबळी येथील एका हॉटेल मध्ये हत्या करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, हुबळी येथील उनकल भागातील एका खासगी हॉटेलमध्ये अज्ञात हल्लेखोरानी चंद्रशेखर गुरुजी यांच्यावर चाकूने वार करत हत्या केली. या हत्यानंतर सदर हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलीस ह्या हल्लेखोरांचा शोध गतीने घेत आहेत. नेमकी ही हत्या कोणत्या कारणातून झाली हे अजूनही स्पष्ट झालेले नाही.
चंद्रशेखर गुरुजी यांनी सरळ वास्तु या संस्थेच्या माध्यमातून सर्वत्र परिचित होते. त्यांनी वास्तूतील विविध समस्यांविषयी अनेकांना सखोल मार्गदर्शन करून वास्तु समस्या सोडविल्या होत्या. त्यामुळे त्यांचा शिष्यवर्गही मोठा आहे. वास्तुशास्त्रावर आधारित त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्याबरोबरच विविध टीव्ही वाहिन्यांवरही अनेक वास्तू विषयक कार्यक्रम प्रसारित झाले आहेत. त्यांच्या या हत्येमुळे मोठी खळबळ उडाली आहे.