गडहिंग्लज ( प्रतिनिधी): महागाव (ता.गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयात दि.७ जुलै रोजी 'एस.जी.एम. टॅलेंट हंट' स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये बारावी विज्ञान या शाखेतून उत्तीर्ण झालेले विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सामायिक परीक्षा MHT-CET चा सराव व्हावा हा हेतू आहे. यासाठी कॉम्प्युटर बेसड् टेस्ट ऑफलाइन पद्धत अवलंबली जाणार आहे. तसेच ८ जुलै रोजी ऑनलाईन पद्धतीने फिजिक्स केमिस्ट्री व मॅथेमॅटिक्स या विषयाचे मार्गदर्शन तज्ञ शिक्षकांकडून केले जाणार आहे.स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह प्रमाणपत्र व रोख पारितोषिकाचे वितरण करण्यात येणार आहे. तरी या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन प्राचार्य डॉ.एस.एच.सावंत यांनी केले आहे. स्पर्धेसाठी समन्वयक म्हणून प्रा. डॉ. ए.ए.माने, प्रा.एस.टी मातले, प्रा. ए. बी. फराक्टे, प्रा. एम.जी मुल्ला हे काम पाहत आहेत.