🔘वडरगे रोड परिसरातील नागरिकांचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
![]() |
गडहिंग्लज : रस्त्याचे सुरू असलेले काम लवकर पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देताना वडरगे रोड परिसरातील नागरिक. (छाया: मज्जिद किल्लेदार) |
या निवेदनात म्हटले आहे की, वडरगे रोड परिसरात मांगलेवाडी ते विद्यानगर पर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरू आहे. मात्र सध्या पावसाळा सुरू झाल्याने या ठिकाणी अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम गतीने होणे गरजेचे आहे. या संदर्भात यापूर्वीही निवेदनातून लक्ष वेधण्यात आले होते. मात्र अद्याप याकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. या रस्त्याचे काम नियमानुसार लवकरात लवकर पूर्ण करून लोकांची होणारी गैरसोय टाळावी अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास प्रसंगी आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी या निवेदनातून दिला आहे.
या निवेदनावर माजी नगरसेवक बाळासाहेब वडर, संतोष मांगले, जयवंत अस्वले, मज्जिद किल्लेदार, शाम वडर, दादू सुतार, उमेश मुसळे, राजू मोहिते, विकी मोहिते, भारत थोरवत, विशाल बारामती, चिंतामणी वाली, शितल माणगावी आदींच्या सह्या आहेत.