शिक्षणतज्ञ म्हणून उपसरपंच मायापा धनगर यांची निवड
गडहिंग्लज ( प्रतिनिधी): विद्या मंदिर बुगडीकट्टे शाळेच्या शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सौ.यल्लवा इरापा हुगाई यांची तर उपाध्यक्षपदी बसवराज शिवगोंडा घस्ती व शिक्षणतज्ञ म्हणून उपसरपंच मायापा पिरगापा धनगर यांची निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर या सर्व पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.