कृषीकन्यांनी शेतकऱ्यांना केले मार्गदर्शन
तेरणी : येथे कृषी सप्ताह निमित्त शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या. यावेळी उपस्थित मान्यवर.
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : तेरणी येथे रोशनबी शमनजी कृषी महाविद्यालयामार्फत कृषी सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शिवानंद नेजी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच मोसीम मुल्ला होते.
यावेळी शेतकऱ्यांना कृषीकन्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी कृषी दिन व कृषी सप्ताहाचे महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी प्रमुख पाहुणे शिवानंद नेजी यांनी शेतकऱ्यांना योग्य उसाची लागवड, सोयाबीन पेरणी व इतर पायाभूत शेती विषयक अडचणी बाबत मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, कृषी सहाय्यक विजय गुजर यांनीही मार्गदर्शन केले.
दरम्यान, या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक मल्लाप्पा इंगवले व शब्बीर कंगनी यांचा सेवानिवृत्तीबद्दल तसेच संगमेश्वर विकास सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. तेरणी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक पदाचा पदभार स्वीकारल्याबद्दल ग्रामसेवक निवृत्ती कोंडुस्कर यांचा देखील ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करून सत्कार करण्यात आला.
![]() |
तेरणी : येथे शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी महाविद्यालयाचे पदाधिकारी. यावेळी उपस्थित गावातील मान्यवर व शेतकरी. |