Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

निडसोसी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी अपघातातून बालबाल बचावले

हुबळीहून परतताना इनोवा गाडीला धारवाड नजीक अपघात

इनोवा गाडी रस्त्यावर घसरल्याने तीन वेळा झाली पलटी

भक्तगणानी घटनास्थळी धाव घेत स्वामीजी यांच्यासह इतरांना काढले सुखरूप बाहेर

भक्तांनी काळजी करू नये आपण सुखरूप आहोत : स्वामीजी


हत्तरगी (वार्ताहर):
निडसोसी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामीजी धारवाड नजीक झालेल्या अपघातातून बालबाल बचावले. या अपघातात कारचालक व स्वामीजींचे दोघे शिष्य यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अपघाताची बातमी पसरताच सर्व भक्तगणांकडून स्वामीजींच्या प्रकृतीची विचारणा करण्यात आली. स्वामीजी सुखरूप असल्याची बातमी समजतात सर्वांना समाधान वाटले. दरम्यान, स्वामीजी यांनी रुग्णालयातून आपण ठीक असून कुठेही दुखापत झालेली नाही देवाच्या कृपेने अनर्थ टळला आहे काळजी करू नये असे आवाहन सर्व भक्तांना केले आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी 'सरळ वास्तू'चे प्रख्यात वास्तु ज्योतिषी चंद्रशेखर गुरुजी यांची काल हुबळी येथे हत्या झाली होती. चंद्रशेखर गुरुजी यांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी स्वामीजी हुबळीला गेले होते. हुबळी वरून परत येताना हुबळी- धारवाड रस्त्यावर त्यांची इनोवा गाडी रस्त्यावर अचानक घसरली व तब्बल दोन-तीन वेळा पलटी झाली. सुदैवाने गाडीतील बलून वेळीच उघडल्याने स्वामीजी सुखरूप बचावले. अपघाताची बातमी समजतात धारवाड येथील भक्तगण तातडीने घटनास्थळी धाव घेत स्वामीजीना व गाडीतील इतरांना सुखरूपपणे बाहेर काढले. तातडीने त्यांना बेळगाव येथील केएलई रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. स्वामीजी आता सुखरूप असून त्यांच्यावर डॉक्टर उपचार करत आहेत. ही घटना दुपारी साडेचारच्या दरम्यान घडली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.