गडहिंग्लज( प्रतिनिधी): इयत्ता अकरावी विज्ञान केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचे आवाहन गडहिंग्लज पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. या संदर्भातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून अर्ज भरण्याची प्रक्रिया दिनांक 6 ते 15 जुलै पर्यंत चालणार आहे. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली.
गडहिंग्लज शहरातील कोणत्याही महाविद्यालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी www.11sciencegad.co.in या वेबसाईटवर आपली संपूर्ण माहिती व आपण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या महाविद्यालयाचे पसंतीक्रम ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहे. प्रवेश प्रक्रिये बाबत काही तक्रार असल्यास एम. आर. प्रशाला गडहिंग्लज येथे निवारण्यात येईल. प्रवेश प्रक्रिये बाबतची सविस्तर माहिती वरील वेबसाईटवर उपलब्ध आहे. प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष व शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर, सचिव व गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ, कार्याध्यक्ष संजय कुंभार यांनी केले आहे.
11th Admission
ReplyDelete