Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

चांदेवाडी येथे मनसे शाखेचे उदघाटन

चांदेवाडी : येथे मनसेच्या शाखा उदघाटनाप्रसंगी जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले, उद्योजक महादेव कोंडुसकर, सरपंच प्रभाकर कुंभार यांच्यासह इतर मान्यवर व कार्यकर्ते.
आजरा: चांदेवाडी( ता आजरा) येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखेचे उदघाटन मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उद्योजक महादेव कोंडुसकर, सरपंच प्रभाकर कुंभार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

याप्रसंगी बोलताना मनसेचे जिल्हा अध्यक्ष नागेश चौगुले म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उघडण्यात आलेली ही शाखा केवळ राजकारणासाठी नसून समाजकारणासाठी उघडली आहे. या माध्यमातून समाजातील विविध प्रश्न व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जातील. शाखा उघडण्या मागचा हाच उद्देश आहे असे सांगितले. यावेळी मनसेचे आजरा तालुका उपाध्यक्ष आनंदा घंटे यांनी मनोगत व्यक्त केले. 

यावेळी शाखा अध्यक्षपदी‌‌ सुमित‌ जाधव,उपाध्यक्षपदी विशाल जाधव, सचिवपदी कार्तिक गिलबिले यांची‌ नियुक्ती करण्यात आली. या कार्यक्रमास मनविसे जिल्हा अध्यक्ष  प्रभात‌ साबळे , महिला जिल्हा अध्यक्षा पुनम भादवणकर ,तालुका अध्यक्ष अनिल निऊंगरे,तालुका उपाध्यक्ष कमलेश येसादे,  तालुका सचिव चंद्रकांत सांबरेकर ,वसंत‌ घाटगे,प्रथमेश सुकवे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.