अन्न व पुरवठा विभाग व यमकनमर्डी पोलिसांची कारवाई
50 किलोच्या 480 तांदळाच्या पोती जप्त, चालक ताब्यात
यमकनमर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद
हत्तरगी (नामदेव पंढरी) : पुणे- बेंगलोर महामार्गावर हत्तरगी टोलनाक्या नजीक हुक्केरी अन्न व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी व यमकनमर्डी पोलिसांनी काळा बाजारात विक्रीसाठी नेण्यात येणारा रेशनचा तांदूळ पकडला. यावेळी 50 किलो वजनाचे 480 पोती जप्त करण्यात आली. याप्रकरणी ट्रक चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा ट्रक हुबळी कडून कोल्हापूरकडे चालला होता. दरम्यान हत्तरगी टोलनाक्या जवळील हिडकल डॅम क्रॉस येथे हुक्केरी अन्न व पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी ह्या ट्रकची तपासणी करत ही कारवाई केली. या प्रकरणाची नोंद यमकनमर्डी पोलीस ठाण्यात झाली आहे.