Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'संत गजानन'मध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी मुलाखतीचे आयोजन

नोकरीच्या नामी संधी; ऑनलाईन नोंदणी करण्याचे आवाहन

गडहिंग्लज(प्रतिनिधी): महागाव (ता. गडहिंग्लज) येथील संत गजानन महाराज रुरल पॉलीटेक्निकमध्ये दि.६ ते १५ जुलै दरम्यान नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्याकडून कॅम्पस मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेआहे. यासाठी कोल्हापूर, सांगली,सिंधुदुर्ग, रत्नागिरी, बेळगाव जिल्ह्यातील पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षातील व सध्या उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पात्र असणार आहेत. कंपनीच्या महत्त्वाच्या पदाकरिता ही मुलाखत असून दीड ते दोन लाख वार्षिक वेतन  श्रेणीवर विद्यार्थ्यांची निवड होणार असून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग व्हावे असे आवाहन संस्थाध्यक्ष ॲड.आण्णासाहेब चव्हाण व प्राचार्य प्रा. डी. बी.केस्ती यांनी महाविद्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. 

 कॅम्पस इंटरव्ह्यूवसाठी कंपन्यांचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. दि.६ रोजी सुलझर इंडिया पुणेसाठी मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल २०२२ बॅचचे विद्यार्थी, दि.८ रोजी कमिन्स इंडिया पुणेसाठी फक्त महिला उमेदवारांसाठी, दि.९ रोजी गोल्ड प्लस फ्लोट ग्लास प्रा. लि.साठी मेकॅनिक मधून २०२२,२१,२० वर्षातील उत्तीर्ण  पुरुष उमेदवारांसाठी, दि.१२ रोजी सिग्मा इंजिनियर सोल्युशन पुणे करिता मेकॅनिकल, ऑटोमोबाइल, इलेक्ट्रिकल २०२२,२१,२० मधील उमेदवार, दि.१४ रोजी नेक्स्टियर ऑटोमोटिव्ह इंडिया,पुणेसाठी मेकॅनिकल किंवा प्रोडक्शन मधील२०२२ चे विद्यार्थी, दि.१५ रोजी विशय कॉम्पोनन्टस  प्रा.ली.पुणेसाठी इलेक्ट्रॉनीक्स ॲड टेलीकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रिकल किंवा मेकॅनिकल मधील २०२२चे विद्यार्थ्यांसाठी मुलाखत होणार आहे.

या मुलाखत सप्ताहाच्या निमित्ताने पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव जिल्ह्यातील ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात संत गजानन शिक्षण समूहाने पुढाकार घेतला आहे. या पॉलीटेक्निकमधील पहिल्या सत्रात वार्षिक परीक्षाच्या अगोदरच २४२ विविध कंपनीत विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.तर दुसऱ्या सत्रात अनेक नामवंत कंपन्यांच्या मुलाखतीचे आयोजन करीत आहोत. यासाठी अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन या नामी संधीचा लाभ घ्यावा यासाठी https://sites.google.com/view/sgmrp-sixmnc-campusdrives/home या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर  पुढील संपूर्ण प्रक्रिया येथे होणार असल्याचे माहिती  डॉ. संजय चव्हाण यांनी दिली.

 यावेळी डॉ. यशवंत चव्हाण, सचिव ॲड. बाळासाहेब चव्हाण, डॉ. सुरेखा चव्हाण, डॉ. प्रतिभा चव्हाण, प्लेसमेंट अधिकारी संतोष गुरव, महादेव बंदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.