वडरगे : येथे वृक्षारोपण करताना शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक वर्ग.
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज विद्या संकुलातील संभाजीराव माने जुनिअर कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत वडरगे येथील घाट परिसरात संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. प्रारंभी एन. एस. एस. चे कार्यक्रमाधिकारी प्रा. एम. एस. घस्ती यांनी स्वागत करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. याप्रसंगी वडरगे ग्रामपंचायत उपसरपंच अजित खोत, संतोष आडावकर, प्रशांत मोरे, उत्तम गोरुले, प्रसाद आडावकर, प्रवीण सावंत, चेतन चौगुले, कपिल पाटील यांच्यासह पर्यवेक्षक प्रा. टी.व्ही.चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. या वृक्षारोपणामध्ये जांभूळ, फणस, आवळा, कडुलिंब,कांचन, फायकस आदी प्रकारच्या रोपांचा समावेश आहे.
शिवराज महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे वडरगे येथे वृक्षारोपण
July 02, 2022
0