शिवराज महाविद्यालयाचे ३७ विद्यार्थी मानकरी
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या शिष्यवृत्ती मध्ये शिवराज महाविद्यालय अव्वल ठरले असून यावर्षी देखील शिवाजी विद्यापीठ गुणवत्ता शिष्यवृत्तीत महाविद्यालयाचे बी.एससी १, बी कॉम १४, एम.कॉम २, बीए१, एम.ए भाग एक व एम.एस.सी, बी.सी.ए प्रत्येकी १ असे ३७ विद्यार्थी मानकरी ठरले. या सर्व विद्यार्थ्यांची एकूण २ लाख ५० हजार रुपयांची शिष्यवृत्ती विद्यापीठाने त्यांच्या बँक खात्यावर नुकतीच जमा केली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे, सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड. दिग्विजय कुराडे यांचे प्रोत्साहन तर प्राचार्य डॉ.एस.एम.कदम व सर्व प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले. रजिस्ट्रार संतोष शहापूरकर व नेताजी कांबळे यांनी प्रशासनाच्या वतीने पाठपुरावा केला.