मुंबई(सौजन्य: पीआयपी):भारतीय क्रिकेट संघ पुढील जुलै महिन्यात वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. येथे एकदिवसीय तीन सामने तर टी ट्वेन्टीचे पाच सामने हे दोन संघ खेळणार आहेत. या दोन संघात होणाऱ्या या सर्व क्रिकेट सामन्यांचे थेट प्रक्षेपण केवळ डीडी स्पोर्ट्स वाहिनीवर पाहता येणार आहे.. डीडी स्पोर्ट्स जुलैच्या दौऱ्यातील सर्व भारत-वेस्ट इंडिज सामने डीडी फ्री डिश व्यतिरिक्त सर्व केबल आणि डीटीएच प्लॅटफॉर्मवर प्रसारित करेल.
भारताचा वेस्ट इंडिज दौरा २२ जुलै ते ७ऑगस्ट २०२२ पर्यंत असणार आहे. क्रिकेट सामन्यांच्या थेट प्रक्षेपणाशिवाय तज्ज्ञ आणि क्रिकेट मान्यवरांशी सामनापूर्व आणि सामन्यानंतरच्या विश्लेषणावर आधारित विशेष कार्यक्रमदेखील डीडी स्पोर्ट्स प्रसारित करणार आहे.
दौऱ्याचे सविस्तर वेळापत्रक
दिनांक मॅच वेळ
22.07.2022 1st ODI 7 PM
24.07.2022 2nd ODI 7 PM
27.07.2022 3rd ODI 7 PM
29.07.2022 1st T20 8 PM
01.08.2022 2nd T20 8 PM
02.08.2022 3rd T20 8 PM
06.08.2022 4th T20 8 PM
07.08.2022 5th T20 8 PM