मुचंडी : दिंडी उत्सवाचा प्रारंभ करताना बसवराज हुंदरी. यावेळी उपस्थित इतर मान्यवर.
हत्तरगी (वार्ताहर) : यमकनमर्डी विधानसभा मतदारसंघातील मुचंडी व अष्टे येथील दिंडी उत्सवास प्रारंभ चिकोडी एससी, एसटी भाजप मोर्चा अध्यक्ष बसवराज हुंदरी यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी ह. भ. प. लक्ष्मण महाराज यांनी या पारायणाची जबाबदारी घेतली. गुरुनाथ पाटील, मुकुंद धामणेकर, ह.भ. प. कृष्णा महाराज (सुळगा), कल्लाप्पा जोगते, बसवराज शुभाजी, राजू धामणेकर, परसराम लाड, गणपती बाबूगौडा, दक्षिण विभाग भाजप अध्यक्ष आप्पाया पुजारी उपस्थित होते.