![]() |
गडहिंग्लज: शिवराज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करताना विद्यार्थी.(छाया:मज्जिद किल्लेदार) |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): येथील शिवराज महाविद्यालयात एन.सी.सी, ज्युनियर, सीनियर एन. एस. एस व खेळ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.एस.एम.कदम होते. तर संस्थेचे सचिव डॉ.अनिल कुराडे, उपाध्यक्ष ॲड.दिग्विजय कुराडे, माजी विद्यार्थी अभिनेता अमोल देसाई, "रात्रीस खेळ चाले" मालिकेतील अभिनेत्री संजीवनी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डी.पी.खेडकर यांनी केले. या कार्यक्रमात विवेकानंद योग केंद्राचे योगगुरू राम पाटील यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले, योग प्रत्येकाच्या जीवनाशी निगडित आहे. शरीर सदृढ होण्यासाठी सर्वांनी योगासन करणे गरजेचे आहे. योगातून निखळ आरोग्याचा अनुभव मिळतो. नित्य नेमाने योगासन करून आपले जीवन अधिक सुंदर व आरोग्यदायी करावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच विविध आजार व व्यसनमुक्तीसाठी जीवनात योगाला फार महत्व आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी विवेकानंद योग ध्यान केंद्राच्या सौ. सुरेखा कळसगोंडा यांच्यासह योग साधकांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. यावेळी पर्यवेक्षक प्रा.तानाजी चौगुले, शिवराज इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका गौरी शिंदे, एन.एस.एसचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जी. जी.गायकवाड ज्युनियर एन.एस.एस.चे प्रा. एम. एस. घस्ती, क्रीडा शिक्षक प्रा. जयवंत पाटील, किरण कावणेकर यांच्यासह सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच गडहिंग्लज हायस्कूलचे एन.सी.सी कॅडेट उपस्थित होते. आभार एन.सी.सी.विभाग प्रमुख कॅप्टन राहुल मगदूम यांनी मानले.
![]() |
| गडहिंग्लज: शिवराज महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगासने करताना विद्यार्थी व विद्यार्थिनी. (छाया: मज्जिद किल्लेदार) |



