चेअरमनपदी अर्जुन जाधव तर व्हाईस चेअरमनपदी बजरंग भोसले यांची निवड

अर्जुन जाधव बजरंग भोसले
जरळी(वार्ताहर): मुगळी तालुका गडहिंग्लज येथील सोमलिंग सेवा संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर.जी.कांबळे यांनी काम पाहिले.संस्थापक सुभाष शिरकोळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमनपदी अर्जुन जाधव, व्हा. चेअरमनपदी बजरंग भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी चेअरमन व व्हा चेअरमन यांचा शाल,श्रीफळ देऊन निखिल शिरकोळे व श्रीपाद स्वामी यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.स्वागत सचिव दिपक चव्हाण यांनी केले.
सदस्यांमध्ये सुभाष शिरकोळे, भिमगोडा पाटील,दत्तात्रय गुरव, दुडेश माने, राम धुळाज, सिध्दनाथ लोखंडे, किरण मुसळे, वसंत शिंगे, लक्ष्मी शिरकोळे, शोभा भोसले यांचा समावेश आहे. पुन्हा चेअरमन व व्हा चेअरमनपदी संधी दिल्याबद्दल जाधव व भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
![]() |
| मुगळी : येथील सोमलिंग सेवा संस्थेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना निखिल शिरकोळे व दिपक चव्हाण. |

