![]() |
| सुरेश आरबोळे विष्णू भोसले |
जरळी (वार्ताहर):तनवडी (तालुका गडहिंग्लज) येथील रामलिंग विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी सुरेश आरबोळे तर व्हा चेअरमनपदी विष्णू भोसले यांची एकमताने निवड करण्यात आली.
सदस्यांमध्ये गुरापा पाटील,पुडलिंक कदम,सुरेश वाळवे आपया पाटील, शरद विचारे, सखाराम जाधव, आनंदा कांबळे, राचया स्वामी, तानाजी रानगे, सावित्री कापसे, सुनिता पाटील यांचा समावेश आहे.
स्वागत सचिव प्रशांत बोगरनाळ यांनी केले.प्रास्ताविकमध्ये गुरांना पाटील यांनी निवडून आलेल्या संचालकांना संस्थेची संपूर्ण माहिती दिली. यावेळी राचया स्वामी यांनी मनोगत व्यक्त केले.चेअरमन, व्हा चेअरमन यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सत्काराबद्दल श्री.आरबोळे व श्री.भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.
![]() |
| तनवडी : येथील रामलिंग विकास सेवा संस्थेचे नूतन पदाधिकारी व संचालक. |


