🔘एम. आर. हायस्कूल, गडहिंग्लज येथे संपर्क कार्यालय
🔘गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांची माहिती
गडहिंग्लज( प्रतिनिधी) : चालू शैक्षणिक वर्षाच्या अकरावी विज्ञानचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीने घेण्याबाबत कमिटीमध्ये ठरविण्यात आले आहे. ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी एम. आर. हायस्कूल गडहिंग्लज हे संपर्क कार्यालय असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी दिली.
सदर प्रवेश प्रक्रियेसाठी इयत्ता दहावीचे गुणपत्रक मिळाल्यानंतर दोन दिवसापासून अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. सदर फॉर्म भरण्याची प्रक्रिया गुणपत्रक मिळाल्यापासून सात दिवस चालू राहणार आहे. इन हाऊस कोटयाव्यतिरिक्त होणारे प्रवेश हे अवैद्य ठरविण्यात येईल. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी फॉर्म फी रुपये १८० इतकी राहणार आहे. इयत्ता दहावीचा सीबीएसई निकाल लागल्यानंतर त्याही विद्यार्थ्यांना सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. फॉर्म भरण्यासाठी शिक्षण विभाग पंचायत समिती गडहिंग्लज यांच्याकडून अधिकृत वेबसाईट http://www.11sciencegad.co.in ही राहील. सदर वेबसाईटवर फॉर्म कसे भरायचे हे सर्व माहिती वरील वेबसाईटवर व्हिडिओ उपलब्ध असणार आहेत. सदर वेबसाईट ही गुणपत्रक मिळाल्यानंतर कार्यरत राहणार आहे. सदर प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी एम.आर. हायस्कूल हे संपर्क कार्यालय असून यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी (9404627823), कार्याध्यक्ष (9923251531) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन गटशिक्षणाधिकारी नवलकुमार हालबागोळ यांनी केले आहे.