🔘डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसानिमित्त हलकर्णी येथे नेत्र तपासणी शिबिर
🔘नेत्र तपासणी शिबिराचा २१० रुग्णांनी घेतला लाभ
🔘शस्त्रक्रियेसाठी ३२ रुग्णांना पाठवले सांगलीला
हलकर्णी ( सुनील भुईंबर ): प्रत्येक समाजातील उपेक्षित घटकापर्यंत पोहचून त्यांच्या सुख -दुःखाचा भार उराशी बाळगून काम करणारे कार्यकर्ते म्हणून डॉ. गंगाधर व्हसकोटी यांना ओळखले जाते. तळागाळातील सर्वसामान्य जनतेची नाडी ओळखून त्यांच्या विविध समस्या मार्गी लावण्याचे केलेले प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद असून तेेे सर्वसामान्यांचे आधारवड आहेत असे प्रतिपादन गोड साखरचे माजी संचालक अमर चव्हाण यांनी केले.
डॉ. गंगाधर व्हसकोटी यांच्या वाढदिवसा निमित्य श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्यातून आयोजित मोफत नेत्र तपासणी व अल्प खर्चात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर प्रसंगी ते बोलत होते.
स्वागत व प्रास्ताविक अमानुल्ला मालदार यांनी केले . यावेळी राजू पाटील , चंद्रकांत गुरवानगोळ , दुंडापा चौगुले, प्रसाद जोशी यांची भाषणे झाली. २१० रुग्णांनी या शिबीराचा लाभ घेतला.शस्त्रक्रियेसाठी ३२ रुग्णांना सांगली येथे पाठवण्यात आले.
या कार्यक्रमास लायन्स आय हॉस्पिटल सांगलीचे डॉ. रियाज मुजावर, गडहिंग्लज तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे संचालक संजय चौगुले, आप्पासाहेब टोणपी,काशिनाथ पाथरवट, गौतम सन्माने,शिवा संसुधी,दीपक नौकुडकर , प्रकाश घटग्यानावर, सागर टोणपी , फिरोज ताशिलदार , रेमो मठपती , आल्ताफ कडलगे , हमिद पानारी , यांच्यासह कार्यकर्ते व रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित हाेते. सुनील भोसले व विजय थोरात यांनी शिबिराचे नियोजन केले . सुशांत नौकुडकर यानी आभार मानले.