![]() |
गडहिंग्लज : येथील शिवराज महाविद्यालयात बी.ए. भाग तीनच्या विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा समारंभात मार्गदर्शन करताना प्रा. किसनराव कुराडे. यावेळी उपस्थित सेवानिवृत्त प्रा. के.बी. केसरकर. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी): शिवराज महाविद्यालयात बी.ए भाग ३ च्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्रा. के.बी.केसरकर उपस्थित होते. संस्था सचिव डॉ.अनिल कुराडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी स्वागत तेजस्विनी नेवडे यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. आर. पी.हेंडगे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष प्रा. किसनराव कुराडे म्हणाले, बदलत्या काळाच्या व नव्या पिढीच्या गरजा ओळखून शिक्षणाचा पॅटर्न स्वीकारणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी नेमके काय शिकले पाहिजे याचा सारासार विचार करून नेमके शिक्षण घेणे आवश्यक आहे. बदलत्या शिक्षणाची गरज ओळखून शिक्षणाची दिशा बदलली पाहिजे. महाविद्यालयात पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनाची दिशा ठरवली पाहिजे आणि आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी शिवराजच्या ज्ञानाची शिदोरी घेऊन आपल्या आयुष्याची वाटचाल सक्षम करणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सेवानिवृत्त प्रा. के.बी.केसरकर, संस्था सचिव डॉ. अनिल कुराडे, डॉ. एस.बी. माने आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आदित्य शिलेदार, तेजस्विनी पाटील, विक्रम लोहार, सचिन मगदूम या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली विभुते, अक्षता रजपूत, तेजस्विनी पाटील यांनी केले. तर आभार प्रा. सोनाली डंगे यांनी मानले.