![]() |
बुगडीकट्टी : येथील विद्यामंदिरात देणगीदारांचा सत्कार व शालेय साहित्य वाटपाप्रसंगी गावातील विविध पदाधिकारी व शिक्षक वर्ग. |
गडहिंग्लज (प्रतिनिधी) : बुगडीकट्टी विद्या मंदिर येथे देणगीदारांचा सत्कार व दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले.
यावेळी माजी सैनिक व मुंबई पोलीस वसंत तुकाराम पाटील यांच्या वतीने त्यांच्या कन्या अर्पिता व स्वस्ती यांच्या सौजन्याने शाळेतील दत्तक विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. वसंत पाटील यांनी दत्तक विद्यार्थ्यांची पुढील शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची वर्षभराची परीक्षा भरण्याची तयारी दर्शवली आहे. यावेळी उपसरपंच मायाप्पा धनगर ,वसंत पाटील,शिक्षण समिती सदस्य इराप्पा हुगाई, कामांना नाईक, संभाजी कोणूरे, पिराजी नार्वेकर, सुरेश लोहार, मुख्याध्यापक सुनील यादव यांच्यासह पालक शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.