गडहिंग्लज (प्रतिनिधी) : चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आमदार पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी राष्ट्रवादीचे चंदगड तालुकाध्यक्ष भिकू गावडे यांनी आमदार राजेश पाटील यांना केक भरवत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार पाटील यांनी सत्कार व शुभेच्छा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सर्वांचे आभार मानले.