Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’चे पंतप्रधानांच्या हस्ते उदघाटन


मुंबई :(सौजन्य: पीआयबी)
 : राज्यपालांचे निवासस्थान व कार्यालय असलेल्या ‘जलभूषण’ या नव्याने बांधण्यात आलेल्या वास्तूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. नवीन बांधण्यात आलेल्या ‘जलभूषण’ या वास्तूमध्ये जुन्या वास्तूमधील ठळक वारसा,वैशिष्ट्ये यांचे जतन करण्यात आले आहे.

मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एलफिन्स्टन यांनी मलबार हिल येथे सन १८२० – १८२५ या काळात ‘प्रेटी कॉटेज’ नावाचा छोटा बंगला बांधला होता. ‘जलभूषण’ ही वास्तू याच जागेवर उभी आहे.जलभूषण या वास्तूला किमान २०० वर्षांचा इतिहास आहे. 

अनेकदा बांधली गेलेली व विस्तारित केलेली जुनी वास्तू निवासासाठी असुरक्षित असल्याचे आढळून आल्यामुळे या ठिकाणी नवी वास्तू बांधण्याचे ठरविण्यात आले.१८ ऑगस्ट २०१९ रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नव्या ‘जलभूषण’ इमारतीची पायाभरणी देखील केली होती. हे बांधकाम पूर्ण झाले असून नव्या वास्तूचे द्वारपूजन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.  



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.